आंतरराष्ट्रीय बेस्टसेलर’ पुस्तकाचे लेखक, ज्यांनी द 48 लॉज ऑफ पॉवर लिहिलं आहे, त्यांनीच वाचकांना वर्षभर शिकता येईल असं मौल्यवान दैनंदिन शहाणपण, तसंच प्रकाशित व अप्रकाशित लेखनाचं सार हे नवा दिवस नवा नियम या पुस्तकातून दिलेलं आहे. ज्यांनी आपल्याला 48 नियमांमध्ये पारंगत केलं, त्या विद्वान लेखकाने आपल्या भल्यासाठी ह्या पुस्तकात 366 नियम सादर केलेले आहेत. ते म्हणतात – तुमच्या आवडीचं क्षेत्र ओळखा. इतरांना तुमच्याकडे येण्याची गरज कशी पडेल, ते ओळखा. तुमच्या अंगातील विचित्रपणाला दृढ आलिंगन द्या. तुमच्या अपयशातून शिकत जाऊन परिपूर्ण व्हा. तुमचे अनुयायी बनवा. तुमच्या नशिबाबरोबर सुसंवादी व्हा. तुमच्या स्वतःच्याच अंतरंगात डोकावून पाहा. प्रसिद्ध तत्त्ववेत्ता आणि जीवनकौशल्य शिकवणारे रॉबर्ट ग्रीन अनेक शतकांमधून प्राप्त झालेलं शहाणपण वापरून, आपल्या आयुष्याला आकार देणाऱ्या आवश्यक स्रोतांचं गुप्त सत्य आपल्याला सांगत आहेत. त्यांचे लाखो वाचक त्यांना सर्वाधिक मूलभूत प्रश्न विचारतात… जसे की, ‘मी अधिक सत्ताधारी सबळ कधी होणार आहे? माझ्या आयुष्याचं नियंत्रण माझ्याकडे कसं राहील? आणि मी जे करतो आहे, त्यात जास्तीतजास्त पारंगत कसा होईन ?’ त्यांचं उत्तर हे आहे की, नवा दिवस नवा नियम हे पुस्तक उचला आणि वाचा.


नवा दिवस नवीन नियम (Nava Divas Nava Niyam)
500.00 ₹ 450.00 ₹
Language : मराठी
Author : रॉबर्ट ग्रीन
Category : मागदर्शनपर
Author : रॉबर्ट ग्रीन
Category : मागदर्शनपर
Publication : मधुश्री पुब्लिकेशन
Pages : 450
Binding : Paperback
Description
Reviews (0)
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.