लोकसंस्कृती, लोकजीवन, लोकपरंपरा, लोकविधी
आणि लोकाचार ज्या लोकप्रतिभेतून आविष्कृत होतो
तो प्रतिभास्पर्श म्हणजे लोकसाहित्य.
लोकसाहित्यात शब्द साकार होतो तो नाद, हेल, आवाज, उच्चार यांचे विविध ढंग घेऊन. शिवाय तो शरीराच्या हालचाली आणि मुद्रेवरील अविर्भाव यातूनच उगवतो. भाषा, संगीत आणि नृत्य या व्यापारांची माध्यमे आणि साधने इथे एकत्र वावरत असतात.
डॉ. शंकर राऊत यांनी या ग्रंथात लोकसाहित्याची स्वरूप मीमांसा तर स्पष्ट केलीच आहे; पण लोकसाहित्यातून येणारी लोकदैवते, मिथके यांच्या विषयीचे आपले आकलनही नोंदविले आहे. तसेच काही लोकसाहित्याचे संदर्भ असणाऱ्या साहित्याची आस्वादक समीक्षाही केली आहे.
लोकसाहित्याच्या अभ्यासकांना हा ग्रंथ या दृष्टीने
निश्चितच उपयुक्त ठरेल.
लोकसाहित्य : आकलन आणि आस्वाद
160.00 ₹ 144.00 ₹
- Book Name : लोकसाहित्य : आकलन आणि आस्वाद (Loksahitya : Akalan Ani Asvad)
- Publication : स्वरूप प्रकाशन (Swarup prakashan)
- Author : डॉ . शंकर राऊत (Dr. Shankar Raut)
- Language : मराठी (Marathi)
- Pages : 143
Description
Reviews (0)
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.