साधारणतः वाङ्मयाचा विचार करीत असताना केवळ वाङ्मयकृतीचाच तेवढा विचार करावा, असा मराठीतील बहुसंख्य समीक्षकांचा आग्रह असतो. परंतु साहित्यनिर्मिती ही काही अधांतरी घडणारी गोष्ट असत नाही.
साहित्यकृतीचा एक निर्माता असतो. त्या निर्मात्याला एक व्यक्तिमत्व असते आणि त्या व्यक्तिमत्वाच्या भोवती अफाट जनसमुदाय पसरलेला असतो. कधी कधी राजकीय चळवळी या जनसमुदायाला आकार देत असतात. एकंदरीत निर्मात्याच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होते. तर या साऱ्या घटकांमधून. मग हे व्यक्तिमत्व आपले व्यक्तिमत्व जपत जपत भोवतीच्या जीवनाचा विचार करीत असते. या विचारातून कधी तरी वाङ्मयकृतीचा संभव होत असतो. त्यामुळे वाङ्मसकृतीतून या साऱ्याच गोष्टी येणे किती अपरिहार्य ठरते, ते पुन्हा वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणजे कलावंताच्या भोवती असणाऱ्या परिघाचा दाब केवढा मोठा असतो, हे आपण साहित्यकृतीचे अंतरंग पाहू लागलो की लक्षात येते. याचा अर्थ असा, की परिघाचा दाब कलाकृतीच्या संभवासाठी कारण तर असतोच, पण परिघातील काही गोष्टींमुळे कलाकृतीचे रूपही बदलून जाते, नव्हे, तिच्यात मूल्यात्मकताही येऊ शकते.
हे सूत्र या ग्रंथातील सर्वच लेखांमधून कळत न कळतपणे पसरून राहिले आहे. एका अर्थाने मराठी साहित्याचा घेतलेला हा वेघ एका व्यापक परिघाच्या संदर्भामुळे रूढ समीक्षेपेक्षा वेगळा ठरावा.
Description
Reviews (0)
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.