तो गिधाडाकडे पाहात राहिला… अगदी शेवटपर्यंत !
नदीमध्ये अडीच-तीन वर्षाच्या बाळाच्या हाडांचा सांगाडा पाण्यावर
हेलकावत होता!
सिद्धार्थने सर्रर्रकन आपली नजर वळवली… त्याच्या बाजूला मूल कधी
येऊन थांबलं होतं याचंही त्याला भान नव्हतं. मुलगाही त्या हाडाच्या
सांगाङ्याकडे पाहात असावा. सिद्धार्थ गुडघ्यावर बसला. दोन्ही हातांनी
त्याचे खांदे धरले आणि मुलाच्या डोळ्यात खोलवर बघत म्हणाला,
भीती वाटतेय?”
मुलाने मान हलवून होकार दिला.
त्याच्या नजरेला नजर भिडवून सिद्धार्थ आत्मविश्वासाने म्हणाला,
”घाबरू नकोस… जोपर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत ही गिधाडे जवळ
येत नसतात ! ते आपल्या मरणाची वाट पाहत घिरट्या घालत आहेत,
म्हणूनच आपण मरायचं नाही…”
“आपल्याला जिवंत रहावंच लागेल!”
एका सत्य घटनेवर आधारीत कादंबरी…केदारनाथ १७ जून !
FREE SHIPPING
Free Shipping On Above 1999 Rs
ONLINE PAYMENT
Multiple payment methods.
24/7 SUPPORT
Unlimited help desk.
100% SAFE
Cutomers first choice.
Reviews
There are no reviews yet.