रतन टाटा या नावाची ओळख करून देण्याची गरज नाही. हे नाव आज देशातील घराघरात आदरानं घेतलं जातं. १५० वर्ष्याच्या टाटा उद्योगसमूहाची धुरा समर्थपणे पेलणा-या टाटा यांच्या कार्य कर्तृत्वाचा परिचय आपल्याला असला, तरी या सामर्थ्यामागे असणारे अपार कष्ट, अडचणींशी सामना, बुद्धिचातुर्य आणि दातृत्वाची आपल्याला फारशी ओळख नाही. ही ओळख करून देण्याचं काम सुधीर सेवेकर यांनी या पुस्तकातून केलं आहे.
टाटा उद्योगसमूहाच्या स्थापनेपासून या पुस्तकाचा प्रारंभ होतो. रतन टाटा यांचं बालपण आणि जन्म यांची माहिती देऊन त्यांच्या अध्यक्षपदाच्या वाटचालीचा वेध घेतला आहे. अध्याक्षपदाची धुरा सांभाळताना आलेल्या अडचणीत, टाटा ग्रुपची ग्लोबल भरारी, नॅनो, मुल्यांची जोपासना, संशोधन आणि ज्ञानप्रसाराचं कार्य आदींचा परिचय लेखकानं करून दिला आहे.
Reviews
There are no reviews yet.